शिवसेनेच्या काही लोकांनी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्यांकडे एका उद्यानाला "टिपू सुलतान" चे नाव देण्याची मागणी केली, पण ती मागणी रास्त आहे का ? आणि टिपू सुलतान चे उदात्तीकरण करणे गरजेचे आहे का ?
स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेने अनेक वेळेला हिंदुत्व विरोधी भूमिका घेतलेली आहे. अगदी आत्ताच नाही तर खूप आधिपासुन आणि त्यात आता भर पडली आहे ती "टिपू सुलतान" या जिहादी शासकाचे नाव एका उद्यानाला देण्याची. शिवसेनेच्या काही लोकांनी BMC च्या अधिकार्यांकडे, एका उद्यानाला टिपू सुल्तान चे नाव दिले जावे अशी मागणी केली असता ती मागणी मान्य झाली आहे असे समजले. तुष्टीकरणाचे राजकारण करत असताना टिपू सुल्तान सारख्या क्रूर शासकचे नाव एखाद्या उद्यानाला देणे योग्य आहे का ? ही गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे. टिपू सुल्तान ला आपल्या देशातील अनेक तथाकथित इतिहासकारांनी अनेक वेळेला त्याच्या कर्तृत्वापेक्षा मोठे दाखवण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु औरंगजेबानंतर जर त्याच्या इतक्याच क्रूर शासक कोणी झाला असेल तर तो टिपू सुल्तान.
टिपू सुल्तान ने लिहीलेल्या अनेक पत्रांमध्ये त्याची इतर धर्मियांच्या बद्दल असलेली घृणा अगदी उघड उघड पणे दिसून येते. १७८६ मध्ये टिपू सुल्तान ने मीर मुईनूद्दीन ला सांगून जवळपास पन्नास हजार कूर्ग जमातीतील हिंदूंचे इस्लाम मध्ये बळजबरी धर्मांतरण केले. त्याच्या पत्रात तो लिहितो, “This being an event calculated to give strength to the people of Islam, we wish that brother all joy o
n this auspicious occasion.” (Select Letters of Tippoo sultan, letter no. CCII, pages 236- 37.)
टिपुने त्याच्या सबंध आयुष्यात ३ लाखांपेक्षा जास्त हिंदूंचे बळजबरीने धर्मांतरण केले व ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही त्यांना मारून टाकले.
१७८२ मध्ये हैदर आली गेला तेव्हा टिपू च्या हातात राज्य आले. (Historical Sketches of the South of India, Vol. I, page 841.) या पुस्तकात नमूद केले आहे की टिपू
सुल्तान च्या हातात राज्य येताच त्याने हिंदू मंदिरांची लुटालूट सुरू केली. सोने, चांदी सगळ्या गोष्टी लुटल्या जाऊ लागल्या आणि अनेक मुर्त्या तोडल्या जाऊ लागल्या. हिंदू मंदिरांमधील पवित्र मानल्या जाणार्या बैलांना मारण्यात त्याला विशेष आनंद होत.
१६ जून १७८४ साली नूर मोहोम्मद याला लिहलेल्या पत्रात आढळून येते की हजरत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५०,००० हिंदू व ख्रिश्चन लोकांचे धर्मांतरण करून घेण्यासाठी टिपुने आदेश दिले होते. नूर मोहोम्मद ने या आदेशांचे पालन करत तितक्या लोकांचे धर्मांतरण केल्याचे दाखले अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये आढळतात.
१७८४ मध्ये बेदनूर काबिज केल्यावर तिथे राहणार्या एका पोर्तुगी फादर ने लिहून ठेवले आहे की बेदनूर काबिज करताच टिपुने ख्रिश्चनांवर अत्याचार करायला सुरुवात केली. अनेक हिंदू मंदिरे पाडण्यासाठी त्याने त्याच्या सैनिकांना संगितले. जिहादी मानसिकतेच्या सैनिकांनी हिंदू मंदिरातील पूजर्यांचे वाईट हाल केले. पट्टनम चे हिंदू मंदिर सुद्धा या सैनिकांनी पाडले.
१७९० मध्ये एका ब्रिटिश अधिकार्याने लिहून ठेवले आहे की टिपू सुल्तान ने राज्य करायला सुरुवात करताच सगळ्या प्रशासकीय जगांवरून हिंदूंना काढून टाकले व त्या ठिकाणी केवळ मुसलमानांना काम करण्याची संधी दिली. ज्यांना म्हणून इथे काम करायचे होते त्यांना इस्लाम धर्म स्विकारण्याशिवाय काहीही पर्याय उरला नव्हता.
१७८८ मधील एका पत्रव्यवहारातून आढळून येते की टिपू सुल्तान इतका क्रूर होता की त्याने मुद्दामहून २०० ब्राह्मणांचा खतना केला आणि त्यांना गोमांस खाऊ घातले.
पाओलिना दा सान बरतोलोमिओ या पोर्तुगी रोमन कॅथॉलिक मिशनरीने त्याच्या वृतंतात लिहून ठेवले आहे की १७९६ च्या आस पास टिपुने ३०,००० पेक्षा जास्त हिंदू व ख्रिश्चनांचे बळजबरीने धर्मांतरण केले व स्त्रियांवर अमानुष अत्याचार घडवून आणले. त्यांना नग्नावस्थेत भर रस्त्यात हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांचे मृतदेह झाडांवर लटकावले जात. त्याने लहान मुलांना सुद्धा सोडले नाही.
अशी अनेक उदाहरणं आहेत, पत्रव्यवहार आहेत ज्यात स्पष्टपणे दिसून येते की टिपू सुल्तान एक क्रूर शासक होता व त्याने त्याचे सबंध आयुष्य काफिरांना मारण्यासाठी म्हणून घालवले. त्याच्या आयुष्यात असा एकही प्रसंग नाही ज्याच्यामुळे त्याचे नाव आदराने घेतले जावे. त्याने ब्रिटीशांना पळवून लावले या सगळ्या गोष्टी खोट्या असून त्याच्याही मागे धार्मिक कारणेच होती. टिपू ला दक्षिण भारतात दार-उल-इस्लाम स्थापन करायचे होते म्हणून त्याने इंग्रजांना हाकलून लावायचे अनेक प्रयत्न केले, याचा अर्थ त्याने इंग्रजांना पळवून लावले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असा होत नाही.
परंतु आत्तापर्यंत अनेक इतिहासकारांनी, त्यांच्या चेल्यांनी टिपू सुल्तान चे क्रूर पैलू सोडून मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत उदात्तीकरण केले आहे. “टिपू सुल्तान” चे नाव एखाद्या उद्यानाला द्यावे असा विचार शिवसैनिकांच्या मनात येतो यावरूनच ते मूळ विचारसरणी पासून किती दुरावत चालले आहेत हे दिसून येते. कधीकाळी स्वतःला हिंदूहृदय सम्राट म्हणवून घेणार्या बाळासाहेबांच्या पक्षाला स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण करावे लागत आहे यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही !
सरतेशेवटी मुस्लिम बांधवांनी तरी टिपू सुल्तान ला आदर्श मानावा का ? मुस्लिम बांधवांनी इतिहास योग्य स्त्रोत वापरून जाणून घ्यावा म्हण जे राजकीय पक्ष त्यांच्या मताची पोळी वाट्टेल तशी भाजू शकणार नाहीत.
- Malhar Heramb Pandey
コメント